प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान पनवेलमधील फार्महाउसवर आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. यामुळे सलमान खानने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. पनवेल जवळच्या वाजेपुर येथील अर्पिता फार्म हाउसवर सलमान खान बुधवारी रात्रीच दाखल झाला आहे. संचार बंदी असल्याने पुढील २१ दिवस तो या ठिकाणीच थांबण्याची शक्यता आहे. सलमान खान सोबत त्याचे वडील सलीम खान आणि कुटुंबीय आहेत.

#LokmatNews #salmankhan #coronavirus #lokmatmanoranjan
#lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सब्स्क्रिब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber